बेळगाव | कै. बाबुराव लक्ष्मणराव जाधव आणि कै. बसव्वा कल्लाप्पा येळ्ळूरकर प्रायव्हेट ट्रस्ट, विजयनगर – बेळगाव तर्फे, सामाजिक बांधिलकीतून शासकीय मराठी मुलांची शाळा क्र. १६, बसवाण गल्ली, शहापूर येथे गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.
या उपक्रमात ट्रस्टचे संस्थापक श्री. M.B. जाधव (निवृत्त सहाय्यक आयुक्त आणि ॲडव्होकेट) तसेच ट्रस्टी श्री. विनायक विलास जाधव यांनी विद्यार्थ्यांच्या हातात शालेय साहित्याचे किट सुपूर्द केले.
कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. या उपक्रमातून अनेकांना शैक्षणिक प्रगतीसाठी प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
शाळेच्या वतीने ट्रस्टचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले असून, या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढीस लागेल, असेही शिक्षकांनी सांगितले.