बेळगाव | बेळगावातील दुचाकीप्रेमी आणि साहसी युवक-युवतींनी जगातील सर्वात उंच रस्त्यावरून यशस्वी बाईक राईड करत मोठं यश मिळवलं आहे. लेह-लडाखमधील उमलिंग ला (Umling La) हा समुद्रसपाटीपासून तब्बल १९,०२४ फूट उंचीवरील रस्ता पार करत त्यांनी एकूण १६०० किलोमीटर अंतराची ७ दिवसांची साहसी मोटारसायकल यात्रा पूर्ण केली.
या साहसी बाईक राईडमध्ये सहभागी झालेले बेलगावचे युवक-युवती म्हणजे:
👉 अलिशा पाटील, योगेश कदम, निहाल देसाई, सलोनी पाटील,
नम्रता शहापुरकर , ओंकार मोरे, प्रशांत शहापूरकर , सौरव चिमडे,
मिलिंद पाटील, ओंकार पवार, तुषार पावशे आणि महादेव कंबार .
संपूर्ण लेह-लडाख ट्रिप दरम्यान बाईकस्वारांनी खडतर हवामान, ऑक्सिजनच्या कमतरतेसह विविध नैसर्गिक अडचणींना सामोरे जात जगातील सर्वात उंच रस्ता पार करत भारताच्या सिमेवरील शौर्य आणि सौंदर्य अनुभवले.
उमलिंग ला हा रस्ता हिमालयाच्या खडकाळ, बर्फाच्छादित रांगा आणि अत्यल्प तापमानाच्या स्थितीत देखील बाइकने पार करणे हे साहस, चिकाटी आणि शारीरिक तयारी यांचं उत्कृष्ट उदाहरण मानलं जातं.
या राईडने केवळ स्वप्नपूर्तीच केली नाही, तर बेलगावच्या युवकांची साहसाची आणि जिद्दीची ओळखही निर्माण केली आहे.
🗣️ “सप्तरंगी डोंगररांगा, थरारक रस्ते आणि अशक्य वाटणाऱ्या उंचीवरून चालताना आम्ही आमचं स्वप्न जगलो… ही आठवण आयुष्यभर पुरेल!” – असं मत सहभागी सदस्यांनी व्यक्त केलं.
बेळगावकर या युवकांचं अभिनंदन करत असून, अशा साहसी प्रवासातून प्रेरणा घेण्याचं आवाहन विविध संघटनांनी केलं आहे