कोल्हापूर खुल्या स्पीड स्केटिंग स्पर्धेत बेळगांवच्या स्केटर्सची दैदीप्यमान कामगिरी

कोल्हापूर खुल्या स्पीड स्केटिंग स्पर्धेत बेळगांवच्या स्केटर्सची दैदीप्यमान कामगिरी

बेळगांव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचे स्केटर्स कोल्हापूर येथील सचिन टीम टॉपर्स स्केटिंग अकॅडमी तर्फे आयोजित शिवसमर्थ खुल्या स्पीड स्केटिंग स्पर्धेत सहभागी झाले होते. कोल्हापूर येथे पार पडलेल्या या स्पर्धेत ३०० पेक्षा अधिक नामवंत स्केटिंगपटूंनी सहभाग घेतला होता.

या अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत बेळगांवच्या स्केटर्सनी उल्लेखनीय कामगिरी करत एकूण ७ सुवर्ण, ४ रौप्य व १ कांस्य अशी १२ पदकांची कमाई केली.

स्पर्धेतील पदक विजेते स्केटर्स पुढीलप्रमाणे आहेत —
जानवी तेंडूलकर हिने २ सुवर्ण पदके पटकावली, शल्य तरळेकरने २ सुवर्ण पदके जिंकली. अमिषा वेर्णेकरने २ रौप्य पदकांची कमाई केली. आरशान माडीवालेने १ सुवर्ण व १ कांस्य पदक मिळवले. सौरभ साळोखेंने २ सुवर्ण पदके पटकावली तर प्रीतम बागेवाडीने २ रौप्य पदके जिंकली.

हे सर्व स्केटर्स के.एल.ई. सोसायटी स्केटिंग रिंकगुड शेफर्ड स्केटिंग रिंक येथे नियमित सराव करत असून प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, विठ्ठल गंगणे, योगेश कुलकर्णी, विश्वनाथ येल्लूरकर व सोहम हिंडलगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ही यशस्वी कामगिरी साध्य केली आहे.

या खेळाडूंना डॉ. प्रभाकर कोरे, माजी आमदार शाम घाटगे, राज घाटगे, उमेश कलघटगी व प्रसाद तेंडुलकर यांचे मोलाचे प्रोत्साहन लाभत असून बेळगांवच्या क्रीडा क्षेत्रातील ही कामगिरी जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी ठरली आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

twelve − 8 =

error: Content is protected !!