बेळगावमध्ये जुगार व मटका अड्ड्यांवर पोलिसांचा छापा; ६ जण अटकेत, ₹६,७४६ रोख व जुगार साहित्य जप्त

बेळगावमध्ये जुगार व मटका अड्ड्यांवर पोलिसांचा छापा; ६ जण अटकेत, ₹६,७४६ रोख व जुगार साहित्य जप्त


बेळगाव | प्रतिनिधी

बेळगाव शहरातील कॅम्प व हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत बेकायदेशीर जुगार आणि मटका अड्ड्यांवर पोलिसांनी एकाच दिवशी धडक कारवाई करत एकूण सहा आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत ₹६,७४६ रोख रक्कम, जुगारासाठी वापरलेले पत्ते, मटका चिठ्ठ्या व साहित्य जप्त करण्यात आले आहे.

कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत दिनांक ९ जानेवारी २०२६ रोजी विजय नगर परिसरातील सार्वजनिक ठिकाणी मटका जुगार खेळत असताना नारायण सावंत (रा. पाईपलाईन रोड, हिंडलगा, बेळगाव) याला अटक करण्यात आली. आरोपीकडून ₹३,१४६ रोख व मटका चिठ्ठ्या जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी गुन्हा क्रमांक ०३/२०२६ अन्वये कलम ७८(III) केपी अ‍ॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, हिरेबागेवाडी पोलीस ठाणे हद्दीत त्याच दिवशी बसवाण गल्ली परिसरातील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत सार्वजनिक ठिकाणी जुगार खेळत असलेल्या पाच जणांवर छापा टाकण्यात आला. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे —
बुद्धिराज शांतिनाथ भागण्णवर (३३), किरण नारायण खिल्लारी (४५), भरतेश माणिक संकेश्वरी (५२), विनायक प्रकाश गवळी (३७) आणि सूरज प्रकाश दळवी (२८) अशी आहेत. त्यांच्याकडून ₹३,६०० रोख५२ पत्ते जप्त करण्यात आले. या प्रकरणी गुन्हा क्रमांक ०५/२०२६ अन्वये कलम ८७ केपी अ‍ॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन्ही कारवायांमध्ये एकूण ६ आरोपींना अटक करून त्यांच्याकडून ₹६,७४६ रोख रक्कम व जुगार साहित्य जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई करणाऱ्या संबंधित पीएसआय व पोलीस कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचे पोलीस आयुक्त, बेळगाव शहर तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विशेष कौतुक केले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

nineteen − eight =

error: Content is protected !!