बस्तवाड (हा) दिनांक 7/7/2025 रोजी मराठा मंडळ संचलित बस्तवाड हायस्कूल मध्ये 16वा कै. सौ. सुवर्णाताई रामचंद्र राव मोदगेकर स्मृतिदिनानिमित्त शालेय गणवेश वितरण कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य . रामा मंगेश काकतकर होते कार्यक्रमाचे सुरुवात मुलींच्या स्वागत गीताने करण्यात आली त्यानंतर दोन मिनिटे मौन पाळण्यात आले . कै.सौ. सुवर्णाताई आर मोदगेकर यांच्या फोटोचे पूजन एसडीएमसी अध्यक्ष शिवाजी सुभाष काकतकर. प्रकाश देसाई व रमेश राव मोदगेकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक श्री विजय खांडेकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
याप्रसंगी श्री विजय खांडेकर सरांनी श्री रामचंद्र राव. सी. मोदगेकर माजी जिल्हा पंचायत सदस्य व मराठा मंडळ विश्वस्त कमिटीचे उपाध्यक्ष यांच्या कार्याचा आढावा घेतला व त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची माहिती दिली. तसेच श्री प्रकाश देसाई, श्री शिवाजी काकतकर, श्री रमेशराव मोदगेकर, यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला अनुसरून श्री किरण मोदगेकर व सुरज मोदगेकर व सर्व पाहुण्यांच्या हस्ते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना गणवेश वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित नागरिक पालक सर्व शिक्षक वर्ग विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व विद्यार्थ्यांना शिरा व उपीट अल्पोहार देण्यात आल हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता शिक्षक श्री परशुराम लोहार, सौ दीपा चौगुले, व सौ सायली गुरव यांनी विशेष परिश्रम घेतला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री बी बी पाटील यांनी तर आभार श्री प्रमोद पाटील यांनी केले.
मराठा मंडळ बस्तवाड हायस्कूल बस्तवाड मध्ये 16वा कै.सौ सुवर्णाताई रामचंद्र मोदगेकर स्मृतिदिनानिमित्त शालेय गणवेश वितरण कार्यक्रम संपन्न
