बेळगाव, दि. ६ जानेवारी :
महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगाव यांच्या वतीने मंगळवार दिनांक ६ जानेवारी रोजी मराठा मंदिर व तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन येथे भव्य सामान्यज्ञान स्पर्धा अभूतपूर्व उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत पूर्वप्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयीन गटांतील तब्बल ३,००० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
स्पर्धेचे उद्घाटन मराठा मंदिर येथे मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. श्री. रमेश पावले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, तर प्रकाश मरगाळे यांच्या हस्ते महाराष्ट्र–कर्नाटक सीमाप्रश्नी धारातीर्थी पडलेल्या हुतात्म्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी समिती नेते आर. एम. चौगुले, रमाकांत कोंडुस्कर, मदन बामणे, अप्पासाहेब गुरव, पंढरी परब, अमर येळ्ळूरकर, नगरसेवक रवी साळुंखे, ॲड. सुधीर चव्हाण, वाय. पी. नाईक, महिला आघाडी अध्यक्षा रेणू किल्लेकर, माजी महापौर सरिता पाटील, जिजामाता महिला बँक अध्यक्षा लता पाटील, भरती किल्लेकर, शिवानी पाटील, विश्वजित हसबे, विलास बेळगावकर, श्रीधर जाधव, उमेश पाटील, प्रशांत पाटील, विकास मांडेकर आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
यावेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर यांनी स्पर्धकांना शुभेच्छा देताना, आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांची गरज ओळखून तसेच सीमाभागातील मराठी भाषा व संस्कृतीच्या संवर्धनाच्या दृष्टीने अशा उपक्रमांचे आयोजन अत्यंत कौतुकास्पद असल्याचे सांगितले.
सीमाभागातील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांची गोडी निर्माण व्हावी, त्यांचा बौद्धिक विकास व्हावा, भविष्यातील स्पर्धा परीक्षांना आत्मविश्वासाने सामोरे जाण्याची तयारी व्हावी तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आत्मसात व्हावा, या उद्देशाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यंदा या स्पर्धेचे पाचवे वर्ष असून त्याला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष अंकुश केसरकर, कार्याध्यक्ष सचिन केळवेकर, उपाध्यक्ष राजू कदम, सिद्धार्थ चौगुले, वासू सामजी, सरचिटणीस श्रीकांत कदम, चिटणीस साईनाथ शिरोडकर यांच्यासह संतोष कृष्णाचे, सुरज कुडूचकर, अमित देसाई, किरण हुद्दार, विनायक कावळे, आशिष कोचेरी, प्रतीक पाटील, आकाश भेकणे, महांतेश अलगोंडी, अजय सुतार, युवराज मुतगेकर, रोहन कुंडेकर, जगन्नाथ कुंडेकर, सुरज पाटील, निखिल देसाई, विशाल गौंडाडकर, साईराज जाधव, प्रवीण धामनेकर, सौरभ तोंडले, अक्षय बांबरकर, ओमकार नारळकर, ओमकार चौगुले, आनंद पाटील, शुभम मोरे, अशोक पाटील, वैभव अतीवाडकर, सुरज चव्हाण, विकास भेकणे, जोतिबा पाटील, राकेश सावंत, कुलदीप कानशिडे, यश तारिहाळकर, सागर मुतगेकर, अभिजित अष्टेकर, कर्ण पाटील, रितेश पावले, साक्षी गोरल, प्राजक्ता केसरकर, वैष्णवी चौगुले, वृषाली पाटील, रोहन शेलार, महेश चौगुले, प्रवीण कोराने, पार्थ वाडकर, दर्शन घाटेगस्ती, ओमकार मनवाडकर, ओमकार शिंदे, परशराम शिंदे, प्रियांका पाटील, सोनाली लोहार, निकिता चौगुले, ऋतुजा पाटील, ममता चौगुले, शीतल सुंठकर, वैष्णवी येतोजी, भावना गडकरी, खुशी कांग्राळकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
