जपान फुनाकोशी शोतोकान कराटे संलग्न मानस कराटे स्पोर्ट्स अकॅडमी, बेळगाव यांच्यावतीने वार्षिक कलर बेल्ट व ब्लॅक बेल्ट वितरण समारंभ २०२५ चे आयोजन करण्यात आले होते. हा भव्य समारंभ रविवार, दिनांक २८ डिसेंबर २०२५ रोजी संत मीरा इंग्लिश मीडियम स्कूल, लक्ष्मीनगर, हिंडलगा, बेळगाव येथे अत्यंत उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संत मीरा शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती आरती धीरज पाटील उपस्थित होत्या. प्रमुख मान्यवर म्हणून डॉ. शिवाजी कागणीकर, श्री. शंकर कांबळे (दलित संघर्ष अध्यक्ष), डॉ. राहुल पाटील, शिक्षिका श्रद्धा चौगुले, श्री. अभय पाटील (आरपीडी महाविद्यालयाचे मुख्याध्यापक), मोहन पवार (बेकिनकेरे), सुनील गावडे (बेकिनकेरे), सोमशेखर मिस्रीगोटि, शंकर हिरामणी, अमृत पाटील, सचिन पाटील, शाहीर व्यंकटेश देवगेकर, रवींद्र पाटील आदी मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली.
या समारंभात उत्कृष्ट प्रगती साधणाऱ्या विद्यार्थ्यांना कराटेतील सर्वोच्च मानला जाणारा ब्लॅक बेल्ट प्रदान करून गौरविण्यात आले.
ब्लॅक बेल्ट प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये ऋतुजा कडोलकर, श्रद्धा कडोलकर, पृथ्वी घेवड, हर्षाली पाटील, महादेव बसरीकट्टी, शिवप्रसाद कौजलगी, कार्तिक भगनाल, सुदर्शन लाठी, ओमकार चलवेनट्टी, सर्वेश कुंडेकर, अमर मारचुटे, विनायक येळ्ळूरकर, साक्षी कांबळे, प्रथम पाटील यांचा समावेश आहे.
संस्थेचे अध्यक्ष व मानस कराटे स्पोर्ट्स अकॅडमीचे संस्थापक सीहान भरमानी एम. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विविध कराटे प्रात्यक्षिके सादर करत शिस्त, संयम, शारीरिक तंदुरुस्ती तसेच स्त्री स्वसंरक्षणाबाबतची कौशल्ये प्रभावीपणे मांडली. या प्रात्यक्षिकांनी उपस्थित पालक, मान्यवर व प्रेक्षकांची मने जिंकली.
हा भव्य समारंभ यशस्वी झाल्याबद्दल सर्व प्रशिक्षक, पालक वर्ग व विद्यार्थ्यांचे उपस्थित मान्यवरांकडून विशेष कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रभावी निवेदन ॲड. तेजस्विनी ॐकार तुमचे यांनी केले.
