नर्तकी प्राईड परिवार लीगच्या स्पर्धा उत्साहात पार पडल्या

नर्तकी प्राईड परिवार लीगच्या स्पर्धा उत्साहात पार पडल्या

न्यू गुड्स शेड रोड, बेळगाव येथील नर्तकी प्राईड व किरण प्लाझा या दोन्ही अपार्टमेंटमधील रहिवाशांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही वर्षाअखेरीस “नर्तकी प्राईड परिवार लीग” क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धा अपार्टमेंटमधील रहिवाशांसाठीच मर्यादित ठेवण्यात आल्या होत्या. लहान गट तसेच महिला व पुरुष गटांसाठी बॅडमिंटन, कॅरम व हाफ पिच क्रिकेट अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून रहिवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

नुकत्याच मोठ्या उत्साहात पार पडलेल्या या स्पर्धांमध्ये हाफ पिच क्रिकेट पुरुष विभागात नर्तकी स्पार्कल संघाने विजेतेपद पटकावले, तर पोरवाल वॉरियर्स संघ उपविजेता ठरला. महिला क्रिकेटमध्ये नर्तकी चॅलेंजर्स संघ विजेता तर नर्तकी स्ट्राईकर्स संघ उपविजेता ठरला.

बॅडमिंटन लहान गटात सिद्धी जनगौडा विजेती ठरली, तर दर्श मंगल उपविजेता ठरला. महिला बॅडमिंटनमध्ये मोक्षा मुंदडा विजेती, तर मनीषा पोरवाल उपविजेती ठरली. पुरुष बॅडमिंटनमध्ये विराज किरण जाधव यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर अभिषेक शहा उपविजेता ठरला.

कॅरम लहान गटात मिलन जैन विजेती तर क्रीश पोरवाल उपविजेता ठरला. महिला कॅरममध्ये मीनाक्षी जांबोटकर विजेती तर अर्पिता मंगलानी उपविजेती ठरली. पुरुष कॅरममध्ये रघु ओझा विजेता तर भावेश पोरवाल उपविजेता ठरला.

विजेत्यांना पारितोषिक वितरणासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विकास कलघटगी, धनंजय पाटील तसेच पोरवाल परिवार उपस्थित होते. या स्पर्धांसाठी आकर्षक चषकांची देणगी बादल पोरवाल व परिवार यांनी दिली.

या क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नितेश जैन, महेश शर्मा, राकेश सकरिया, किरण शर्मा, रघु ओझा, भरत मंगलानी, भावेश जैन, हर्षद शहा, अंकित पोरवाल, कैलास जैन, हर्षित मोदानी, दुर्वांक पाटील तसेच इतर सर्व सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

5 × four =

error: Content is protected !!