नवीन वर्षाच्या मंगलमय प्रारंभासाठी मालिकार्जुन नगर तसेच समर्थ नगर, बेळगाव यांच्या वतीने आयप्पा स्वामींच्या महापूजा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवार, दिनांक १ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता समर्थ नगर तिसरा क्रॉस, मेन रोड येथे आयप्पा स्वामींचा महाअभिषेक विधी भक्तिभावाने पार पडला.
यानंतर रात्री ८ ते ११ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी उपस्थित भाविकांनी मोठ्या श्रद्धेने आयप्पा स्वामींची पूजा केली. बेळगावकरांना शांती, समृद्धी लाभो तसेच सर्वांवर आयप्पा स्वामींचे कृपाशीर्वाद सदैव राहो, अशी सामूहिक प्रार्थना करण्यात आली.
मालिकार्जुन नगर, समर्थ नगर तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आयप्पा स्वामींचे दर्शन घेतले व महाप्रसादाचा लाभ घेतला. हा धार्मिक कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सर्व आयप्पा भक्तांनी विशेष परिश्रम घेतले.
