बेळगाव :
बेळगाव येथील व्यापार-उद्योग क्षेत्रात अत्यंत महत्त्वाच्या विमानसेवांमध्ये झालेल्या अचानक घट व बंदीमुळे व्यवसाय, उद्योग आणि नागरिकांसाठी मोठा अडथळा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर बेळगाव ट्रेडर्स काउन्सिल आणि बेळगाव कापड व्यावसायिक संघटना यांनी उद्या, २ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १२ वाजता सँब्रा विमानतळाचे संचालक श्री. एस. त्यागराजन यांच्यासोबत बैठक घेण्याचे निश्चित केले आहे.
बैठकीत व्यापार, उद्योग आणि नागरी जीवनासाठी महत्त्वाच्या मार्गांवरील विमानसेवा कमी होणे किंवा बंद होण्यामुळे निर्माण झालेल्या अडचणींबाबत चर्चा केली जाईल. तसेच या समस्येबाबत पीएमओ कार्यालय, नागरी उड्डयन मंत्रालय आणि स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनचे डायरेक्टर जनरल यांना निवेदनाद्वारे मुद्दा मांडण्यात येईल.
संघटनांनी सांगितले की, या सेवा पुन्हा सुरळीत रितीने सुरू केल्या गेल्या नाहीत तर प्रदेशाच्या व्यापार व औद्योगिक विकासावर मोठा परिणाम होईल. यासाठी प्रशासनाकडे तातडीने योग्य ती पावले उचलण्याची मागणी करण्यात आली आहे
