बेळगांव :
स्कूल गेम्स 2025 अंतर्गत आयोजित कर्नाटक राज्यस्तरीय स्पीड स्केटिंग स्पर्धेत बेळगांव जिल्ह्यातील स्केटिंगपटूंनी नेत्रदीपक कामगिरी करत आपली छाप पाडली आहे. बेळगांव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनतर्फे निवड झालेले स्केटर्स या स्पर्धेत सहभागी झाले होते. बेंगलोर येथे पार पडलेल्या या स्पर्धेत कर्नाटकातील 300 पेक्षा अधिक अव्वल स्केटिंगपटूंनी सहभाग घेतला होता.
या अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत बेळगांवच्या स्केटर्सनी उत्कृष्ट कौशल्य आणि मेहनतीच्या जोरावर एकूण 13 पदके पटकावली. यात 3 सुवर्ण, 6 रौप्य आणि 4 कांस्य पदकांचा समावेश आहे.
पदक विजेते स्केटर्स पुढीलप्रमाणे :
जानवी तेंडूलकर – 2 सुवर्ण
रश्मीता आंबिगा – 2 रौप्य, 1 कांस्य
आराध्या पी – 1 सुवर्ण, 1 रौप्य
शल्य तरळेकर – 1 रौप्य, 1 कांस्य
ऋत्विक दुबाशी – 1 रौप्य
करुणा वाघेला – 1 कांस्य
अवनीश कामन्नवर – 1 रौप्य, 1 कांस्य
हे सर्व स्केटर्स के.एल.ई. सोसायटी स्केटिंग रिंक तसेच गुड शेफर्ड स्केटिंग रिंक येथे नियमित सराव करत असून प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, विठ्ठल गंगणे, योगेश कुलकर्णी, विश्वनाथ येल्लूरकर आणि सोहम हिंडलगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ही यशस्वी कामगिरी साध्य केली आहे.
या यशासाठी स्केटर्सना डॉ. प्रभाकर कोरे, माजी आमदार शाम घाटगे, राज घाटगे, उमेश कलघटगी, प्रसाद तेंडुलकर तसेच कर्नाटक रोलर स्केटिंग असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी इंदुधर सीताराम यांचे मोलाचे प्रोत्साहन लाभले.
बेळगांवच्या स्केटर्सनी राज्यपातळीवर मिळवलेले हे यश जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानास्पद ठरत असून भविष्यात राष्ट्रीय पातळीवरही हे खेळाडू चमकदार कामगिरी करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
