बेळगाव, ६ जुलै २०२५:
आषाढी एकादशीनिमित्त श्री संत नामदेव दैवकी संस्था, श्री नामदेव मंदिर, खडे बाजार, बेळगाव येथे रविवारी पहाटे श्रद्धा व भक्तीपूर्ण वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
पहाटे ६ वाजता काकड आरतीने सुरुवात झाली. त्यानंतर महाभिषेक व महापूजा विधिवत पार पडले. मंदिर परिसर संपूर्णतः भक्तिरसाने न्हालेला होता. विविध भक्तिगीते, नामस्मरण, आणि श्री संत नामदेव महाराजांच्या अभंगांनी वातावरण भारावून गेले होते.

या भक्तिमय सोहळ्याला संस्थेचे पदाधिकारी, समाजबांधव तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन शिस्तबद्ध आणि भाविकांच्या सोयीसाठी उत्तमरीत्या करण्यात आले होते.