श्रींगारी कॉलनी येथील टीचर्स कॉलनीमधील तरुण समर्थ हानगोजी यांची अग्निवीर म्हणून भारतीय सेनेत निवड झाल्याबद्दल कॉलनीतील नागरिकांच्या वतीने नुकताच त्यांचा गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला. देशसेवेची संधी मिळाल्याने कॉलनीत आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
या सत्कारप्रसंगी कॉलनीतील महिलांनी शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन समर्थ हानगोजी यांचा सत्कार केला. यावेळी महिला ग्रुपच्या माधवी हिंडलगेकर, विजेता काकतीकर, पूनम चौधरी, गीता भस्मे, वंदना वर्णेकर, वैष्णवी डोंगरे, तृप्ती अर्कसाली, प्रधना बांदिवडेकर यांच्यासह इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सत्कारादरम्यान उपस्थितांनी समर्थ हानगोजी यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व त्यांची निवड ही कॉलनीसह परिसरासाठी अभिमानास्पद असल्याचे नमूद केले.
