कॅपिटल वन करंडकाचे उत्स्फूर्त अनावरण

कॅपिटल वन करंडकाचे उत्स्फूर्त अनावरण

बेळगाव (प्रतिनिधी) सलग १४ व्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या कॅपिटल वन करंडकासाठी सुरू असलेल्या एकांकिका स्पर्धेदरम्यान करंडकाचे अनावरण मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सर्वश्री प्रमोद काळे, वामन पंडीत व सुनील खानोलकर उपस्थित होते. यावेळी संस्थेचे चेअरमन शिवाजीराव हंडे, व्हा. चेअरमन शाम सुतार यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस चेअरमन शिवाजीराव हंडे यांनी गेल्या १३ वर्षांच्या कालखंडाचा थोडक्यात आढावा घेतला. मान्यवर परीक्षक, चोखंदळ नाट्यरसिक व नाट्यकर्मी यांच्या सातत्यपूर्ण सहकार्यामुळेच या स्पर्धेची परंपरा अखंड सुरू राहू शकली, असे त्यांनी नमूद केले.

यावेळी बोलताना वामन पंडीत यांनी नाट्यरसिकांकडून मिळणाऱ्या भरघोस प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त करत संस्थेने मेहनतीने उभी केलेली ही स्पर्धा नाट्यचळवळीसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले आणि उपक्रमाचे कौतुक केले.

या प्रसंगी संस्थेचे संचालक रामकुमार जोशी, शिवाजीराव अतिवाडकर, संजय चौगुले, शरद पाटील, लक्ष्मीकांत जाधव, सदानंद पाटील, सुभाष सुंठणकर, निळूभाऊ नार्वेकर तसेच कर्मचारी वर्ग व पिग्मी कलेक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दोन दिवस चालणाऱ्या या एकांकिका स्पर्धेत एकूण १८ संघांनी सहभाग नोंदवला असून, आज पहिल्या दिवशी ९ संघांनी आपले सादरीकरण केले. स्पर्धेतील शेवटच्या एकांकिकेनंतर मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात येणार आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

19 − 4 =

error: Content is protected !!