बेळगाव (प्रतिनिधी) : शहरातील एका सेवाभावी संस्थेतर्फे महिलांवरील अन्याय रोखण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पदमोर्चाची जाहिरात सुरू असताना शहरात एक वेगळीच चर्चा रंगली आहे. मोर्चाचा मार्ग धर्मवीर संभाजी महाराज चौक ते चन्नम्मा चौक असा असतानाही जाहिरातींमध्ये मात्र धर्मवीर संभाजी महाराज चौकाचा उल्लेख ‘बोगारवेस’ असा करण्यात आला आहे.
या चौकाचे नाव बदलण्यासाठी १९७७ साली मोठे प्रयत्न झाले होते. महानगरपालिकेच्या संमतीनंतर ठराव मंजूर करून अधिकृतरीत्या येथे धर्मवीर संभाजी महाराज चौक अशी नोंद करण्यात आली. जवळपास ४५ वर्षांहून अधिक काळ हा चौक त्याच नावाने ओळखला जात असताना, आता जाहिरातीत पुन्हा ‘बोगारवेस’ असा उल्लेख झाल्याने अनेक शंभू भक्तांच्या भावना दुखावल्या गेल्याची प्रतिक्रिया शहरात उमटत आहे.
सामाजिक कार्याचा वसा लाभलेल्या संस्थांकडून अशा संवेदनशील मुद्द्यांवर अधिक जागरूकता ठेवली जावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
