बेळगाव :
कर्नाटक सरकारकडून बेळगाव येथे होत असलेल्या हिवाळी अधिवेशनाला प्रतिउत्तर देण्यासाठी ८ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या मराठी भाषिकांच्या महामेळाव्याच्या तयारीसाठी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक शनिवार, २२ नोव्हेंबर रोजी दुपारी १.०० वाजता मराठा मंदिर (रेल्वे ओव्हरब्रिज) येथे घेण्यात येणार आहे.
सीमाप्रश्न प्रलंबित असतानाही कर्नाटकचे अधिवेशन बेळगावात
नेत्यांचे आवाहन
या बैठकीला समितीचे पदाधिकारी, नियंत्रण समिती सदस्य, युवा आघाडी, महिला आघाडी, महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते आणि सर्व मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन तालुका समिती अध्यक्ष व माजी आमदार मनोहर किनेकर, सरचिटणीस अँड. एम. जी. पाटील, कार्याध्यक्ष आर. एम. चौगुले, उपाध्यक्ष रामचंद्र मोदगेकर, लक्ष्मण होणगेकर, विठ्ठल पाटील, मोनाप्पा पाटील यांनी केले.
