जायंट्सची राज्यस्तरीय मल्टी युनिट कॉन्फरन्स रविवारी बेळगावात

जायंट्सची राज्यस्तरीय मल्टी युनिट कॉन्फरन्स रविवारी बेळगावात

बेळगावजायंट्स इंटरनॅशनलच्या कर्नाटक शाखेच्या वतीने फेडरेशन 6 च्या राज्यस्तरीय मल्टी युनिट कॉन्फरन्स चे आयोजन येत्या रविवारी, बेळगावातील महिला विद्यालय मराठी माध्यम शाळेच्या सभागृहात करण्यात आले आहे.

या विशेष परिषदेत कर्नाटक राज्यातील विविध युनिट्समधून सुमारे १५० सभासद सहभागी होणार असून, जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेन आणि बेळगाव सखी यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटन जायंट्स डेप्युटी वर्ल्ड चेअरमन एम. लक्ष्मणन यांच्या हस्ते होणार आहे. केंद्रीय समिती सदस्य दिनकर अमीन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील, तर कर्नाटक राज्याचे अध्यक्ष पी. तेजस्वीराव हे अध्यक्षस्थानी असतील.

यावेळी विशेष अतिथी म्हणून ज्योती व्यंकटेश, गजानन निलगिरी, ए. किनी, ओबीडी अशोक (स्पेशल कमिटी मेंबर्स), तसेच युनिट एकचे संचालक शिवानंद हिरेमठ उपस्थित राहणार आहेत.

परिषदेदरम्यान विविध सामाजिक, संघटनात्मक आणि विकासात्मक विषयांवर परिसंवाद व चर्चा सत्रे आयोजित करण्यात येणार आहेत. या उपक्रमामधून युनिट्समधील समन्वय वाढवणे, नव्या उपक्रमांना चालना देणे आणि समाजोपयोगी कार्याच्या दृष्टीने दिशा ठरवणे, हा मुख्य उद्देश आहे.

संघटनेच्या वतीने नागरिकांनी परिषदेस उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

one × three =

error: Content is protected !!