बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सहा खटल्यांची १८ नोव्हेंबरला सुनावणी झाली; सर्व खटले पुढे ढकलले

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सहा खटल्यांची १८ नोव्हेंबरला सुनावणी झाली; सर्व खटले पुढे ढकलले

बेळगाव: दि १८. (प्रतिनिधी) महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांवरील एकूण सहा खटल्यांची बेळगाव न्यायालयात सुनावणी झाली. सकाळी १०.३० वाजल्यापासून सर्व कार्यकर्ते दिवसभर न्यायालय आवारात हजर होते. मात्र बहुतेक खटल्यांत साक्षीदार अनुपस्थित असल्याने सर्व खटले पुढील तारखेसाठी तहकूब करण्यात आले.

१) शहाजीराजे भोसले व इतर – Third Court
मराठा क्रांती मोर्चादरम्यान सीमा प्रश्नाचे उल्लेख असलेल्या टी-शर्ट विक्रीचा आरोप या खटल्यात होता. साक्षीदार अनुपस्थित असल्याने सुनावणी पुढे ढकलली.

२) दीपक दळवी व सहाजण – महामेळावा २०१६/१७ – JMFC Fourth Court
दीपक दळवी, प्रकाश मरगाळे, मनोहर किनेकर, मालोजीराव अष्टेकर, विकास कलघटगी व दिगंबर पाटील यांच्यावरील या खटल्यात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे दीपक दळवी यांचे विधान नोंदवण्यात आले. साक्षीदार गैरहजेरीमुळे पुढील तारीख देण्यात आली.

३) २०२१ महामेळावा – दीपक दळवी व २९ कार्यकर्ते – JMFC Fourth Court
सर्व कार्यकर्ते न्यायालयात हजर नसल्याने खटला तहकूब.पुढील तारीख देण्यात आली.

४) दीपक दळवी व ३१ कार्यकर्ते – Fifth Munsif Court
कोरोना काळात मराठी कागदपत्रांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चाप्रकरणी दाखल खटला. सुनावणी पुढील तारखेस.

५) महादेव पाटील व ७ कार्यकर्ते – Fifth Munsif Court
लोकसभा निवडणुकीदरम्यान आचारसंहिता उल्लंघन प्रकरणात दाखल खटला. या खटल्यालाही पुढील तारखेसाठी स्थगिती.

सर्व खटल्यांचे कामकाज अँड. महेश बिर्जे, अँड. बाळासाहेब कागणकर, अँड. मल्लेशी बोंद्रे, अँड. वैभव कुट्रे, अॅड. अश्वजीत चौधरी व अॅड. रिचमन रीची यांनी पाहिले, अशी माहिती देण्यात आली.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

3 × 2 =

error: Content is protected !!