बेळगाव – ग्रामीण पेयजल व स्वच्छता विभागाचे संचालक श्री. नागेन्द्र प्रसाद के. यांच्या अध्यक्षतेखाली जल जीवन मिशन व बहुग्राम पेयजल पुरवठा प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी बैठक बेळगाव जिल्हा पंचायत सभागृहात पार पडली.
या बैठकीस ग्रामीण पेयजल व स्वच्छता विभागाचे मुख्य अभियंता श्री. ऐजाज हुसेन, जिल्हा पंचायत बेळगावचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राहुल शिंदे, विभागाचे प्रशासकीय उपसंचालक श्री. जाफरशरीफ सुतार तसेच जिल्हास्तरीय विविध अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत प्रकल्पांच्या अंमलबजावणीतील प्रगती, अडचणी, व गावागावात पाणी पुरवठ्याच्या कामांची सुसूत्रता यावर चर्चा करण्यात आली. अधिकाऱ्यांना वेळेत आणि गुणवत्तापूर्ण काम पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.