शिव बसव नगर, बेळगाव | प्रतिनिधी
श्री जोतिबा मंदिर, शिव बसव नगर येथे रविवार दिनांक १६ नोव्हेंबर २०२५ रोजी दीपोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या दीपोत्सवाच्या निमित्ताने मंदिर परिसरात तब्बल पाच हजार एक दिवे प्रज्वलित करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
मंदिराच्या विश्वस्त मंडळाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सात वाजता महाआरती होणार असून, सायंकाळी सहा वाजता दीपप्रज्वलन कार्यक्रम पार पडेल. यानंतर सायंकाळी आठ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या पवित्र दिवशी परिसर भक्तीभावाने उजळून निघणार असून, मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून दीप प्रज्वलनात सहभागी व्हावे आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
#Belgav #BedhadakBelgav
