अथणी पोलीस निरीक्षक संतोष हळ्ळूर अडचणीत; 1 लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप, लोकायुक्तांची धाड

अथणी पोलीस निरीक्षक संतोष हळ्ळूर अडचणीत; 1 लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप, लोकायुक्तांची धाड

अथणी : आर्थिक व्यवहार मिटवण्यासाठी 1 लाख रुपयांची लाच मागितल्याच्या गंभीर आरोपावरून अथणी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष हळ्ळूर यांच्या विरोधात एफआयआर दाखल झाला आहे. या घटनेनंतर पोलिस विभागात एकच खळबळ उडाली असून लोकायुक्त पोलिसांनी थेट अथणी पोलीस ठाण्यावर धाड टाकून तपास सुरू केला आहे.

रिअल इस्टेट व्यावसायिक मीरासाब मुजावर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकायुक्त पोलिसांचे प्रमुख हनुमंतराय यांनी या प्रकरणाची पुष्टी केली असून, लोकायुक्त पोलिस उपअधीक्षक भरत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी लोकायुक्त पथकाने अथणी येथे भेट देऊन प्राथमिक चौकशी सुरू केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मीरासाब मुजावर यांनी 20 लाख रुपयांच्या भूखंड खरेदीचा व्यवहार केला होता. मात्र त्यातून त्यांना केवळ 15 लाख रुपये मिळाले. उर्वरित 5 लाख रुपये न मिळाल्याने त्यांनी अथणी पोलिसांकडे तक्रार नोंदवली होती. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी संबंधित पक्षांना बोलावून व्यवहार मिटवून देण्याच्या बदल्यात तब्बल 1 लाख रुपयांची मागणी केली, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणाची चौकशी लोकायुक्त पोलिसांकडून सुरू असून, तपासादरम्यान आवश्यक पुरावे आणि कागदपत्रांची छाननी करण्यात येणार आहे. या घटनेमुळे संपूर्ण पोलिस दलात खळबळ उडाली असून, पुढील काही दिवसांत या प्रकरणात आणखी खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

fourteen + three =

error: Content is protected !!