बेळगाव :
खडेबाजार, बेळगाव येथील डी. के. हेरेकर ज्वेलर्सच्या दुसऱ्या शाखेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त 11 नोव्हेंबर रोजी समाजोपयोगी उपक्रमांचा एक सुंदर कार्यक्रम पार पडला.
सकाळी साडेअकरा वाजता शहरातील शासकीय उच्च प्राथमिक मराठी माध्यम शाळा क्र. 22 येथे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना फराळ वाटप करण्यात आले. या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते बबन भोबे उपस्थित होते. या उपक्रमामुळे मुलांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता, तर शिक्षकवर्गाने डी. के. हेरेकर ज्वेलर्सच्या या सामाजिक भावनेचे मनापासून कौतुक करत आभार मानले.
यानंतर सैनिक नगर येथील जीवन आधार वृद्धाश्रमाला भेट देऊन तेथील ज्येष्ठ नागरिकांना फराळ व भेट वस्तूंचे वाटप करण्यात आले आणि त्यांच्याशी संवाद साधण्यात आला.तसेच वृद्धाश्रमाला आर्थिक मदत करता सामाजिक बांधिलकी जपली.या प्रसंगी डी. के. हेरेकर ज्वेलर्सचे संचालक दिलीप हेरेकर, अतुल हेरेकर, ओमकार हेरेकर, मंदार मुतकेकर, प्रमोद हेरेकर, मंजुनाथ आणि गुरुदत्त आदी उपस्थित होते.
वृद्धाश्रमाचे संचालक श्री. करवालो यांनी डी. के. हेरेकर ज्वेलर्सच्या या सामाजिक कार्याबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त केले. तसेच, ज्वेलर्सतर्फे भविष्यातही अशा समाजोपयोगी उपक्रमांना चालना देण्याचे आश्वासन देण्यात आले.
