राजा शिवाजी बेळगावचा विजयाचा जल्लोष – KSPL सीझन 2 मध्ये दणदणीत कामगिरी! 🏆
बेळगाव : कर्नाटक सॉफ्टबॉल प्रीमिअर लीग (KSPL) सीझन 2 मध्ये राजा शिवाजी बेळगाव संघाने पुन्हा एकदा आपली विजयी परंपरा कायम ठेवत भक्कम विजय नोंदवला.
टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतलेल्या बेळगावच्या गोलंदाजांनी मैसूर महाराजा संघाला केवळ 55 धावांतच गारद केले. प्रत्युत्तरात राजा शिवाजी बेळगाव ने लक्ष्याचा पाठलाग केवळ 6 षटकांत 2 गडींच्या मोबदल्यात पूर्ण करत दणक्यात 8 गडींनी विजय मिळवला. हा विजय संघाच्या एकत्रित कामगिरीचा उत्कृष्ट नमुना ठरला.
🏅 सामनावीर (Man of the Match):
संतोष सुळगे पाटील – 24 धावा (17 चेंडू) आणि 2 षटकांत 10 धावांत 4 बळी
💥 सुपर स्ट्रायकर:
प्रसाद नाकडी – 19 धावा (11 चेंडू)
संघाचा विजय हा तडाखेबाज फलंदाजी, अचूक गोलंदाजी आणि शिस्तबद्ध क्षेत्ररक्षण यांचा परिणाम ठरला.
📅 पुढील सामना:
राजा शिवाजी बेळगाव 🆚 यादगीरी योद्धा
🗓️ 12 नोव्हेंबर 2025 | ⏰ संध्या. 6 वा.
#Belgav #BedhadakBelgav
