बेळगाव – कर्नाटक राज्य सॉफ्टबॉल प्रीमिअम लीग (KSPL) ही राज्यस्तरीय स्पर्धा सध्या बेंगलोर येथे रंगात आली आहे. या प्रतिष्ठित स्पर्धेत राज्यातील प्रत्येक जिल्ह्याची स्वतंत्र टीम उतरली असून बेळगाव जिल्ह्याचं प्रतिनिधित्व “राजा शिवाजी बेळगाव” हा संघ करीत आहे.
डॉ. अंजलीताई फाउंडेशन, खानापूर यांच्या प्रायोजकत्वाखाली हा संघ काल रात्री बेंगलोर येथे दाखल झाला. खेळाडूंमध्ये प्रचंड जोश असून यावेळी फायनलपर्यंत पोहोचून विजेतेपद मिळविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
ही स्पर्धा १ नोव्हेंबरपासून सुरू झाली असून “राजा शिवाजी बेळगाव” संघाची पहिली सामना आज संध्याकाळी ६ वाजता धारवाड संघाविरुद्ध बेंगलोर येथे होणार आहे. सर्वांच्या अपेक्षा या सामन्याकडे लागल्या असून बेळगावचा संघ उत्तम खेळ करून यंदा चॅम्पियन ठरेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
#Belgav #BedhadakBelgav
