बेळगाव महापालिकेच्या स्थायी समिती बैठकीत विविध विषयांवर चर्चा
बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक न्याय स्थायी समितीची बैठक आज (७ नोव्हेंबर) ताई समिती सभागृहात पार पडली. या बैठकीत विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली.
बैठकीदरम्यान १६ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या मागील बैठकीचे इतिवृत्त वाचन आणि मंजुरी देण्यात आली. तसेच २६ एसएफसी अनुदान तसेच ७.२५ आणि ५ टक्के योजनेखाली ० ते ६ आणि ७ ते १३ वयोगटातील मुलांसाठी सिंगल प्रीमियम विमा पॉलिसी राबविण्याच्या प्रस्तावावर चर्चा झाली.
महानगरपालिकेसाठी १३०० ते ६०० सीसी क्षमतेची कार किंवा जीप — स्विफ्ट डिजायर, बोलेरो, सुझुकी बलेनो, टाटा झेस्ट किंवा तत्सम वाहन मासिक भाड्याने घेण्याबाबतचा प्रस्तावही चर्चेस घेण्यात आला.
महापालिका क्षेत्रातील दैनंदिन स्वच्छतेसाठी आवश्यक उपकरणे खरेदीस मंजुरी देण्याचा मुद्दा आणि पौरकार्मिक श्रीमती मीनाक्षी शंकर राठोड यांच्या वैद्यकीय खर्चाच्या परतफेडीबाबतची बाबही चर्चेत आली.
बैठकीत सर्व विषयांवर सविस्तर चर्चा होऊन अध्यक्षांच्या अनुमतीने आवश्यक निर्णय घेण्यात आले.
#Belgav
