कर्जाच्या जबरदस्ती व लिलावाच्या गाजावाजामुळे शेतकऱ्याची आत्महत्या; मार्कंडेय सोसायटीवर कारवाईची मागणी

कर्जाच्या जबरदस्ती व लिलावाच्या गाजावाजामुळे शेतकऱ्याची आत्महत्या; मार्कंडेय सोसायटीवर कारवाईची मागणी

कर्जाच्या जबरदस्ती व लिलावाच्या गाजावाजामुळे शेतकऱ्याची आत्महत्या; मार्कंडेय सोसायटीवर कारवाईची मागणी

बेळगाव (प्रतिनिधी): कडोली येथील शेतकरी सातेरी होन्नाप्पा रूटकुटे यांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या मण्णूर येथील मार्कंडेय सहकारी सोसायटीवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी करत कर्नाटक राज्य रयत संघ आणि हसीरु सेना यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

रूटकुटे यांच्या घरावर काढलेल्या कर्जाच्या परतफेडीसाठी सोसायटीने जबरदस्ती केल्याचा, घरावर नोटीस लावून गावभर लिलावाची घोषणा करून त्यांची मानहानी केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. या दबावामुळे रूटकुटे यांनी आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर आंदोलनकर्त्यांनी रूटकुटे यांचे कर्ज तात्काळ माफ करण्याची, त्यांच्या घराच्या लिलावाची नोटीस मागे घेण्याची आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हा नोंदवण्याची मागणी केली.

धरणे आंदोलनात कर्नाटक राज्य रयत संघ आणि हसीरु सेनेचे नेते आप्पासाहेब देसाई, बेळगाव तालुका अध्यक्ष राजू मरवे, सुभाष धायगोंडे यांच्या नेतृत्वाखाली रूटकुटे यांच्या कुटुंबीयांसह गावातील शेतकरी व महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग होता.

या वेळी शेतकरी नेते आप्पासाहेब देसाई यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत सांगितले की, “शेतकऱ्यांवर अशा प्रकारे अन्याय करणाऱ्या सोसायट्यांवर कठोर कारवाई न झाल्यास राज्यभर आंदोलन उभे राहील.”

शेतकऱ्यांच्या आत्महत्येला जबाबदार असलेल्या घटकांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी एकमुखी मागणी या आंदोलनातून जिल्हा प्रशासनासमोर करण्यात आली.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

fourteen − 1 =

error: Content is protected !!