चौथ्या हॉकी बेळगाव निमंत्रित कप स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ

चौथ्या हॉकी बेळगाव निमंत्रित कप स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ

बेळगाव (प्रतिनिधी): हॉकी इंडियाच्या शताब्दी वर्षानिमित्त बेळगावमध्ये खेळप्रेमींचा उत्सव साजरा होत आहे. लेले मैदानावर आयोजित चौथ्या हॉकी बेळगाव निमंत्रित कप स्पर्धेचा आज सकाळी उत्साहात शुभारंभ झाला. या स्पर्धेचे प्रायोजकत्व अमोदराज स्पोर्ट्स यांनी केले आहे.

उद्घाटनप्रसंगी बोलताना बसवेश्वर बँकेच्या माजी चेअरमन शैलजा जयप्रकाश भिंगे म्हणाल्या, “हॉकी हा नेहमीच भारतीयांचा आत्मा आहे. हा खेळ आपल्या संस्कृतीचा भाग असून हा उत्सव प्रत्येक खेळाडू, प्रत्येक चाहत्यासाठी आनंदाचा क्षण आहे.”

कार्यक्रमाला अध्यक्ष गुळाप्पा होसमनी, उपाध्यक्ष प्रकाश कालकुंद्रीकर, सचिव सुधाकर चाळके, क्रीडाई बेळगाव अध्यक्ष युवराज हुलजी, अमोदराज स्पोर्ट्स चे मुकुंद पुरोहित, चेंबर ऑफ कॉमर्स अध्यक्ष प्रभाकर नागरमुनोळी, दत्तात्रय जाधव, प्रशिक्षक उत्तम शिंदे, मनोहर पाटील, नामदेव सावंत, खानापूरचे प्रशिक्षक गणपत गावडे, आशा होसमनी, डॉ. गिरीजाशंकर माने, सिद्धार्थ चाळके व विकास कलघटगी आदी मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी अमोदराज भिंगे यांचा ४८ वा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला.

स्पर्धेत बेळगाव शहरातील सात महाविद्यालयीन संघांनी सहभाग नोंदवला आहे. मुलांच्या गटात गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्स, आरपीडी कॉलेज, जीएसएस कॉलेज, पीपल ट्री कॉलेज आणि संगोळी रायण्णा कॉलेज हे संघ तर मुलींच्या गटात जीएसएस, आरपीडी आणि संगोळी रायण्णा कॉलेज या संघांचा सहभाग आहे.

स्पर्धा पुढील काही दिवस लेले मैदानावर रंगणार असून बेळगावच्या हॉकीप्रेमींसाठी हा खेळाचा उत्सव ठरणार आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

nine − two =

error: Content is protected !!