भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट; ऐश्वर्या बडमंजीचा मृत्यू आणि आराध्यावर हल्ल्यानंतर नागरिकांचा संताप उसळला! महापालिका झोपेतच का?

भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट; ऐश्वर्या बडमंजीचा मृत्यू आणि आराध्यावर हल्ल्यानंतर नागरिकांचा संताप उसळला! महापालिका झोपेतच का?

बेळगाव शहरात भटक्या कुत्र्यांचा वाढता सुळसुळाट आता थेट नागरिकांच्या जीवावर उठला आहे. काही दिवसांपूर्वी केवळ दोन वर्षांच्या आराध्या या बालिकेवर भटक्या कुत्र्याने हल्ला करून तिला गंभीर जखमी केले, तर नुकतेच बेळगाव रेल्वे स्थानकाजवळ कुत्रा अचानक रस्त्यावर आल्याने झालेल्या अपघातात ऐश्वर्या बडमंजी या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या दोन भीषण घटनांनी संपूर्ण शहर हादरले असतानाही बेळगाव महापालिकेची निष्क्रियता कायम आहे. दररोज शहरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना घडत असल्या तरी प्रशासन झोपेत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

नागरिकांचे प्रश्न स्पष्ट आहेत — “अजून किती जीव गेले तर महापालिका जागी होणार? आमच्या सुरक्षेचं काय?” सध्या बेळगाव महानगरपालिका अनेक बाजूंनी कुचकामी ठरत असून, भटक्या कुत्र्यांवरील कारवाईचा अभाव प्रशासनाच्या उदासीनतेचं जिवंत उदाहरण ठरतो आहे.

भटक्या कुत्र्यांबाबतची समस्या फक्त शहरी भागापुरते मर्यादित नसून शहरालगत असणाऱ्या उपनगरीय भागात देखील ही समस्या गंभीर प्रमाणात आहे तसेच शहराला लागून असणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये देखील या समस्याने नागरिकांना ग्रासले आहे त्यामुळे बेळगाव शहरासोबतच आसपासच्या ग्रामपंचायतींनी देखील याबाबत उपाययोजना करण्याची गरज आहे.

मध्यंतरी बेळगाव महानगरपालिकेच्या माध्यमातून कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्याचची मोहीम राबविण्यात आले होते पण या भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण केल्यानंतर पुन्हा त्यांना सोडून देण्यात येत होते. त्यामुळे संख्या आटोकात आणण्याचा प्रयत्न केला असला तरी मूळ मुद्दा तिथेच राहतो.

या एकंदर पार्श्वभूमीवर शहरात भीतीचे वातावरण पसरले असून, नागरिकांनी तात्काळ कुत्रे पकडण्याची मोहीम राबवावी आणि कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी केली आहे.

#Belgav #BedhadakBelgav

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

five × two =

error: Content is protected !!