बेळगाव : फुलबाग गल्ली येथील सौ. अक्षता सांबरेकर (पाटील) यांनी सी.ए. परीक्षेत यश संपादन करत बेळगावचे नाव अभिमानाने उंचावले आहे. विशेष म्हणजे त्या एक गृहिणी असून संसार आणि मुलांची जबाबदारी सांभाळत त्यांनी ही अत्यंत कठीण परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
अक्षता यांचे शालेय शिक्षण मराठी माध्यमातून झाले असूनही त्यांनी चिकाटी, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर हे यश मिळवले. त्यांच्या या यशामागे सी.ए. सतीश मेहता आणि सी.ए. बी. पी. जिनगौडा यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच पती अक्षय सांबरेकर यांनी सदैव त्यांच्या पाठीशी राहून साथ दिली.
अक्षता यांचे हे यश अनेक गृहिणी आणि विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. #Belgav #BedhadakBelgav
