बसुरते गावातील विस्थापितांना न्याय देणार – जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन
बेळगाव : (प्रतिनिधी) बसुरते गावच्या लोकांची जमीन धरणाच्या प्रकल्पात गेल्यामुळे ग्रामस्थांनी आज जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात बैठक घेतली. ग्रामस्थांनी “जमीन किंवा नुकसानभरपाईचे पैसे मिळाल्याशिवाय धरणाचे काम सुरू करू नये” अशी ठाम भूमिका बैठकीत मांडली.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेतले आणि त्यांना न्याय देण्यात येईल, तसेच योग्य ती कारवाई करून प्रकरणाचा निपटारा लवकरच करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
बैठकीत गावातील शेतकरी, स्थानिक नेते आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. ग्रामस्थांनी या निर्णयानंतर काही प्रमाणात दिलासा व्यक्त केला असून, आता प्रशासनाने आश्वासनाची तातडीने अंमलबजावणी करावी अशी मागणी होत आहे.
#Belgav #BedhadakBelgav
