‘ज्वाला’ दिवाळी अंकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न
बेळगाव : शहापूर येथील नाथ पै चौकातील नेताजी सुभाषचंद्र बोस सभागृह येथे ‘ज्वाला’ दिवाळी अंकाचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या अंकाचे संपादक सुहास हुद्दार आहेत.
या प्रसंगी व्यासपीठावर भारती किल्लेकर, रेणु किल्लेकर, सरिता पाटील, मालोजीराव अष्टेकर, प्रकाश मरगाळे, गोपाळ पाटील, आबासाहेब दळवी, अंकुश केसरकर, रवी साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रकाशनानंतर बोलताना मालोजीराव अष्टेकर आणि प्रकाश मरगाळे यांनी ‘ज्वाला’ दिवाळी अंकाला शुभेच्छा दिल्या. विशेषतः सीमा भागातील तरुण लेखकांनी लिहिलेल्या लेखांचे कौतुक प्रकाश मरगाळे यांनी आवर्जून केले.
संपादक सुहास हुद्दार यांच्या संपादनाखाली प्रकाशित झालेल्या या ‘ज्वाला’ दिवाळी अंकात अनेक उत्तम लेख, कथा आणि कविता वाचकांना वाचायला मिळणार आहेत.
या सोहळ्यास मदन बामणे, उमेश पाटील, प्रतिभा साडेकर, राजाराम देसाई, पांडुरंग सावंत, श्रीकांत कदम, संतोष कृष्णाचे किरण हुद्दार ,शितल पाटील , शिवानी पाटील आणि राधिका सांबरेकर यांच्यासह अनेक मान्यवर व रसिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन उत्साही वातावरणात पार पडले.
