बेळगाव : बेळगाव तालुक्यातील येळ्ळूर येथे दिंडोरी प्रणीत अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वतीने नवीन सेवा केंद्राचा आज भव्य शुभारंभ करण्यात आला.
दादासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ग्राम अभियान विभागा’तर्गत हे नवीन सेवा केंद्र श्री दत्त मंदिर, लक्ष्मी गल्ली, येळ्ळूर येथे सुरू करण्यात आले आहे. या प्रसंगी गावात उत्सवी आणि भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळाले.
शुभारंभानिमित्त भव्य पल्लखी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये श्री स्वामी समर्थांच्या हजारो भक्तांनी उत्साहाने सहभाग घेतला. “जय जय स्वामी समर्थ” च्या घोषणांनी संपूर्ण गाव दुमदुमून गेला.
सोमवार, दिनांक 27 ऑक्टोबर 2025 रोजी पार पडलेल्या या सोहळ्यामुळे येळ्ळूर गावात भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पुढे या सेवा केंद्रात दर सोमवार सायंकाळी 6 वाजता नियमित आरती आयोजित केली जाणार असून, स्वामी भक्तांसाठी साधना, सेवा आणि आराधनेचे हे एक नवे पवित्र स्थळ ठरणार आहे.
