बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेतील अनेक विभाग गेल्या काही दिवसांपासून अक्षरशः ओस पडलेले आहेत. आठवड्याच्या सुरुवातीलाच असा प्रकार घडल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनेक कर्मचाऱ्यांना एससी-एसटी लिंक प्रक्रियेसाठी पाठविण्यात आले आहे. त्यामुळे आरोग्य विभागासह अनेक विभागांमध्ये कामकाज ठप्प झाले आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून हीच स्थिती कायम असून, पुढील दोन दिवसही ही परिस्थिती राहील, अशी चर्चा सुरू आहे.
यामुळे जन्म आणि मृत्यू दाखल्यासाठी आलेल्या नागरिकांच्या लांबच लांब रांगा महानगरपालिकेत दिसत आहेत. अनेकांचे अर्ज प्रलंबित असून कामात मोठा खोळंबा झाला आहे. सध्या जन्म-मृत्यू दाखला विभागात फक्त एकच कर्मचारी फॉर्म घेण्यासाठी उपलब्ध असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
नागरिकांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की, “कर्मचारी बाहेर पाठवले असले तरी पर्यायी व्यवस्था तात्काळ करावी, अन्यथा लोकांचे कामकाज पूर्णपणे ठप्प होईल.”
#Belgav #BedhadakBelgav
