बेळगाव : जय किसान भाजी मार्केटने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या दोन्ही याचिका न्यायालयाने फेटाळल्या आहेत. न्यायालयाने स्पष्ट केले की या प्रकरणात अर्जदारांनी प्रथम कर्नाटका स्टेट अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनलकडे (KAT) जाणे आवश्यक होते.
याबाबत सध्या जय किसान भाजी मार्केट असोसिएशन जवळ कर्नाटका स्टेट अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनलकडे (KAT) यांच्याकडे जाण्याचा पर्याय खुला आहे.
यावर प्रतिक्रिया देताना राजू टोप्पन्नावर म्हणाले, “कोर्टाच्या निर्णयानंतर जय किसान भाजी मार्केटशी संबंधित व्यापाऱ्यांनी आता वास्तव समजून घेतले पाहिजे. त्यांचे आंदोलन संपले असून, APMC मध्ये समस्या निर्माण करणे थांबवून गुण्या गोविंदाने व्यवसाय करावा.”
ते पुढे म्हणाले, “जरी ते KAT कडे गेले तरी आम्ही त्यासाठी पूर्ण तयारीत आहोत.”
दरम्यान, सध्या निर्णयाबद्दल जय किसान भाजी मार्केटच्या व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमता असून, या संदर्भात सर्व व्यापाऱ्यांशी चर्चा करूनच पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती जय किसान भाजी मार्केटच्या संबंधित व्यापाऱ्यांकडून मिळाली आहे.
#Belgav #BedhadakBelgav
