बेळगाव : राणी पार्वतीदेवी पदवीपूर्व महाविद्यालयात ‘तरंग’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून हा उत्सव 28 ते 29 ऑक्टोबर दरम्यान महाविद्यालयाच्या परिसरात पार पडणार आहे. या महोत्सवात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धांमध्ये कबड्डी, व्हॉलीबॉल, रस्सीखेच, नृत्यस्पर्धा, फोटोग्राफी, मुखचित्र, टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू तयार करणे तसेच मिस आणि मिस्टर स्पर्धा यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या सर्व स्पर्धा 8वी, 9वी आणि 10वीतील शालेय विद्यार्थ्यांसाठी खुल्या ठेवण्यात आल्या आहेत.
या निमित्ताने प्राचार्या तृप्ती शिंदे यांनी बेळगाव आणि खानापूर तालुक्यातील सर्व शालेय विद्यार्थ्यांना या स्पर्धांमध्ये सहभागी होऊन आपल्या प्रतिभेला वाव देण्याचे आवाहन केले आहे.
#Belgav #BedhadakBelgav
