बेळगाव : संध्या किरण सेवा केंद्रात ज्ञान व मनोरंजनाचा कार्यक्रम उत्साहात

बेळगाव : संध्या किरण सेवा केंद्रात ज्ञान व मनोरंजनाचा कार्यक्रम उत्साहात

बेळगाव : बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रा तर्फे ज्ञान व मनोरंजनाचा कार्यक्रम डॉ. निता देशपांडे डायबेटिस सेंटर, सोमवारपेठ टिळकवाडी येथे उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वास धुराजी होते. व्यासपीठावर उपाध्यक्ष के. एल. मजूकर, कार्यवाह सुरेंद्र देसाई व खजिनदार विनिता बाडगी उपस्थित होते.

सुरुवातीला सेक्रेटरी सुरेंद्र देसाई यांनी प्रास्ताविक केले. यानंतर के. एल. मजूकर यांनी दक्षिण भारतातील नद्यांची माहिती व त्यांचे महत्त्व यावर प्रकाश टाकला, तर अशोक लोकूर यांनी योगाभ्यासाबद्दल मार्गदर्शन केले.

कार्यक्रमात रविंद्रनाथ जुवळी, योगिनी देसाई, सदाशिव व गिरिजा कुलकर्णी, विजय बांदिवडेकर, श्रेयांश चौगुले, गुरुनाथ शिंदे, विजयमाला पाटील आणि अश्विनी पाटील यांनी मराठी व हिंदी गाण्यांनी रंगत वाढवली.

सुरेंद्र देसाई यांनी स्वागत केले तर विजय वाईगडे यांनी आभार मानले.
सभासदांच्या आग्रहानुसार पुढील काळात दर महिन्याच्या पहिल्या, दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी ज्ञान व मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे आयोजकांनी सांगितले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

seventeen + twelve =

error: Content is protected !!