बेळगांव : युवासेना-शिवसेना बेळगांव यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भव्य किल्ला स्पर्धा २०२४ उत्साहात पार पडली. या स्पर्धेचा मुख्य उद्देश म्हणजे लहान मुलं आणि युवकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांविषयी जागरूकता निर्माण करणे, तसेच हिंदवी स्वराज्याचा इतिहास जिवंत ठेवणे हा होता.
या स्पर्धेला शहर व ग्रामीण भागातून तब्बल २५ मंडळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रत्येक मंडळाने ऐतिहासिक किल्ल्यांचे सुंदर व वास्तवदर्शी नमुने साकारून प्रेक्षकांचे लक्ष वेधले. परीक्षकांनी सृजनशीलता, ऐतिहासिक अचूकता, सादरीकरण आणि संदेश या निकषांवर आधारित निकाल जाहीर केला.
या स्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळा दिनांक १७ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात येणार असून, कार्यक्रमाचे स्थळ लवकरच स्पर्धकांना कळविण्यात येईल.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे घोषित करण्यात आला आहे:
🥇 प्रथम क्रमांक — स्वराज्य युवक मंडळ, भांदुर गल्ली, बेळगांव. (किल्ला – लाहोर)
🥈 द्वितीय क्रमांक — श्री शिवनेरी युवक मंडळ, रघुनाथ पेठ, अनगोळ, बेळगांव. (किल्ला – शिवगंगा)
🥉 तृतीय क्रमांक — श्री शाहू युवक मंडळ, शाहूनगर, बेळगांव. (किल्ला – बैरागदुर्ग)
🏅 चतुर्थ क्रमांक — हट्टीहोळ गल्ली, शहापूर, बेळगांव. (किल्ला – रतनगड)
🏅 पंचम क्रमांक — स्वराज्य युवक मंडळ, संत ज्ञानेश्वर नगर, मजगांव, बेळगांव. (किल्ला – पद्मदुर्ग)
तसेच, उत्तेजनार्थ पुरस्कार खालील मंडळांना जाहीर करण्यात आले —
१️⃣ बाळ शिवाजी युवक मंडळ, नाथ पै नगर, अनगोळ, बेळगांव. (किल्ला – विजयदुर्ग)
२️⃣ श्री हनुमान युवक मंडळ, भांदुर गल्ली, अनगोळ, बेळगांव. (किल्ला – धारूर)
या किल्ला स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल युवासेना बेळगांवचे पदाधिकारी व सर्व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे. ही स्पर्धा केवळ एक सांस्कृतिक उपक्रम नसून, मराठी अस्मिता आणि शिवचरित्राचा गौरव वाढविणारी प्रेरणादायी परंपरा ठरली आहे.
