२०२४ च्या काळा दिन आंदोलनातील कार्यकर्त्यांना न्यायालयाकडून दिलासा — जामीन मंजूर
१ नोव्हेंबर २०२४ रोजी बेळगावात काळा दिनानिमित्त महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांवर विविध गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती. या प्रकरणात एकूण ४५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. संबंधित प्रकरण JMFC II कोर्ट, बेळगाव येथे C.C. Case No. 716/2025 या क्रमांकाने नोंद झाले असून, फाइलिंग दिनांक ७ मे २०२५ व पहिली सुनावणी ७ मे २०२५ रोजी पार पडली होती. या खटल्याची पुढील सुनावणी २८ जानेवारी २०२६ रोजी निश्चित करण्यात आली आहे.
या खटल्यातील एकूण ४५ कार्यकर्त्यांपैकी अंकुश केसरकर, मदन बामणे, सचिन केळवेकर, संतोष कृष्णाचे, गणेश दड्डीकर, श्रीकांत कदम आणि गुंडू कदम या कार्यकर्त्यांना आज JMFC कोर्ट क्र. २ मध्ये जामीन मंजूर करण्यात आला आहे.
सदर खटल्याचे काम ॲड. एम. बी. बोंद्रे, ॲड. महेश बिरजे, ॲड. वैभव कुट्रे आणि ॲड. अश्वजीत चौधरी यांनी पाहिले.
या निर्णयामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून, त्यांनी पुढील न्यायालयीन लढाई कायदेशीर मार्गाने लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
