नंदगड : ६६ वा दीपावली क्रीडा महोत्सव — महिला कबड्डी स्पर्धेत आजरा संघाचा विजय!
नंदगड येथे सुरू असलेल्या ६६ व्या नंदगड दीपावली क्रीडा महोत्सवात यंदा प्रथमच महिला कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या ऐतिहासिक स्पर्धेत आजरा महिला कबड्डी संघाने प्रभावी कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला, तर झुंजवाडकर कबड्डी संघ नंदगडने द्वितीय क्रमांकावर समाधान मानले.
दरम्यान, सलग पावसामुळे पुरुष कबड्डी संघांच्या स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या असून, या सामन्यांच्या नव्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील, अशी माहिती आयोजक समितीकडून देण्यात आली आहे.
#Belgav #BedhadakBelgav
