बेळगाव : (प्रतिनिधी) राज्याचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी बेळगाव एसपी कार्यालयात उत्तर विभागातील अधिकारीांसोबत बैठक घेतल्यानंतर हिवाळी अधिवेशनाच्या सुरक्षेबाबत महत्त्वाची माहिती दिली.
गृहमंत्री म्हणाले, “बेळगाव हिवाळी अधिवेशनादरम्यान उद्भवू शकणाऱ्या समस्या, आंदोलने व कायदा-सुव्यवस्थेच्या स्थितीचा सखोल आढावा घेऊन आवश्यक उपाययोजना ठरवण्यात आल्या आहेत. बेळगाव पोलीस आयुक्त, आयजी उत्तर विभाग तसेच राज्य पातळीवरील एडीजीपी यांच्याशी सल्लामसलत करून एकूण ६,००० पोलिस कर्मचारी अधिवेशनादरम्यान तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.”
अधिवेशन सुरळीत आणि शांततेत पार पडावे यासाठी सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
