बेळगावमध्ये आंतरराष्ट्रीय फसवणूक रॅकेटचा भंडाफोड – ३३ आरोपी अटक, १५ दिवस पोलिस कोठडी

बेळगावमध्ये आंतरराष्ट्रीय फसवणूक रॅकेटचा भंडाफोड – ३३ आरोपी अटक, १५ दिवस पोलिस कोठडी

बेळगाव | प्रतिनिधी

बेळगाव शहरातून अमेरिकन नागरिकांना फसवणुकीचे कॉल करून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय कॉल सेंटर रॅकेटचा बेळगाव पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी अटक केलेल्या ३३ आरोपींना शुक्रवारी तिसऱ्या जेएमएफसी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने १५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

बेळगावातील बॉक्साईट रोडवरील कुमार हॉलमध्ये कार्यरत असलेल्या या बनावट कॉल सेंटरवर डीसीपी नारायण बरमणी यांच्या नेतृत्वाखाली छापा टाकण्यात आला होता. एसीपी रघु, माळमारुती सीपीआय बी. आर. गड्डेकर, एपीएमसी पीआय उस्मान औटी आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

या ठिकाणावरून पोलिसांनी ३७ लॅपटॉप, ३७ मोबाईल फोन, वायफाय राऊटर्स अशा ८ लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त केला. हे आरोपी विविध राज्यांतून बेळगावात येऊन अमेरिकन नागरिकांना “Your Amazon order has been placed” असा संदेश पाठवत आणि त्यातील बनावट क्रमांकावर कॉल करण्यास भाग पाडत. त्यानंतर त्यांची वैयक्तिक आणि बँक माहिती मिळवून, “तुमच्या नावावर बोगस बँक खाती उघडली गेली आहेत” अशी भीती दाखवत फसवणूक केली जात होती.

अटक करण्यात आलेले आरोपी गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, मेघालय, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, कोलकाता, उत्तर प्रदेश, झारखंड आणि नागालँड या राज्यांतील आहेत. या रॅकेटचे मुख्य सूत्रधार गुजरात आणि पश्चिम बंगालमध्ये असल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले असून त्यांच्या अटकेसाठी स्वतंत्र पथक कार्यरत आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

#Belgav #BedhadakBelgav

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

4 + seventeen =

error: Content is protected !!