बेळगाव | 13 ऑक्टोबर 2025
बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन तर्फे आयोजित 19 वी जिल्हास्तरीय स्पीड स्केटिंग स्पर्धा व निवड चाचणी 2025 उत्साहात पार पडली. ही स्पर्धा दोन प्रकारात घेण्यात आली होती — रोड स्पर्धा मालिनी सिटी (येडियुरप्पा मार्ग, ओल्ड पी.बी. रोड)** येथे तर रिंक स्पर्धा शिवगंगा स्पोर्ट्स क्लब स्केटिंग रिंकवर** पार पडली.
जिल्हाभरातून तब्बल 150 हून अधिक स्केटर्स या स्पर्धेत सहभागी झाले होते. स्पर्धेचे उद्घाटन प्रमुख पाहुणे, समाजसेवक व बसवेश्वर बँकचे अध्यक्ष श्री सतीश पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, विश्वनाथ येल्लूरकर, सुरज शिंदे, तसेच पालक व स्केटर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान श्री सतीश पाटील यांचा शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या वेळी त्यांनी सर्व स्पर्धकांना प्रोत्साहन देत सांगितले की, लवकरच बेळगाव शहरात सुसज्ज स्केटिंग ट्रॅक व इतर खेळांसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केले जातील.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रशिक्षक योगेश कुलकर्णी, विशाल वेसने, विठ्ठल गंगणे, सोहम हिंडलगेकर, सागर तरळेकर, ऋषीकेश पसारे, स्वरूप पाटील यांनी मोठे परिश्रम घेतले.
या स्पर्धेच्या माध्यमातून जिल्ह्यातील नवोदित स्केटर्सना आपली गुणवत्ता दाखविण्याची संधी मिळाली असून, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना राज्यस्तरीय निवड चाचणीसाठी पात्रता मिळणार आहे.
