राष्ट्रीय शालेय जलतरण स्पर्धेसाठी आबा–हिंद क्लबच्या १३ जलतरणपटूंची निवड; राज्य पातळीवर ४८ पदकांसह बेळगावचा डंका

राष्ट्रीय शालेय जलतरण स्पर्धेसाठी आबा–हिंद क्लबच्या १३ जलतरणपटूंची निवड; राज्य पातळीवर ४८ पदकांसह बेळगावचा डंका

राष्ट्रीय शालेय जलतरण स्पर्धेसाठी आबा–हिंद क्लबच्या १३ जलतरणपटूंची निवड; राज्य पातळीवर ४८ पदकांसह बेळगावचा डंका

बेळगाव : मैसूर येथे नुकत्याच झालेल्या कर्नाटक राज्य शैक्षणिक खात्याच्या राज्यस्तरीय शालेय जलतरण स्पर्धेत बेळगावच्या आबा व हिंद क्लबच्या जलतरणपटूंनी उत्कृष्ट कामगिरी करून तब्बल १५ सुवर्ण, १८ रौप्य आणि १५ कांस्य अशी ४८ पदकं पटकावत राज्यभरात बेळगावचा डंका वाजवला. या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर या क्लबमधील १३ जलतरणपटूंची निवड दिल्ली येथे नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय शालेय जलतरण स्पर्धेसाठी (एस.जी.एफ.आय) झाली आहे.

कर्नाटक राज्य संघात निवड झालेल्या जलतरणपटूंमध्ये वेदा खानोलकर, निधी मुचंडी, अवनी शहापूरकर, अनन्या रामकृष्ण, कनक हलगेकर, श्रेया जोगमनावर, तन्वी कारेकर, तन्वी मुचंडी, युवराज मोहनगेकर, वरद खानोलकर, अमोघ रामकृष्ण, वरून जोगमनावर आणि अर्णव चिवटे यांचा समावेश आहे.

🏊‍♀️ उत्कृष्ट कामगिरीचा मागोवा

१७ वर्षाखालील मुलींच्या गटात वेदा खानोलकर (जी.जी. चिटणीस स्कूल) हिने १०० मीटर बटरफ्लायमध्ये सुवर्ण, तर ५० मीटर बटरफ्लाय, ५० मीटर बॅकस्ट्रोक आणि रिलेमध्ये रौप्य व कांस्य पदकं जिंकली. अनन्या रामकृष्णा आणि अवनी शहापूरकर (डिव्हाईन प्रॉव्हिडन्स स्कूल) यांनीही अनुक्रमे बॅकस्ट्रोक, फ्रीस्टाइल आणि इंडिव्हिज्युअल मिडलेमध्ये चमक दाखवली.

१७ वर्षाखालील मुलांमध्ये युवराज मोहनगेकर (सेंट झेवियर्स) याने डायव्हिंगमध्ये दुहेरी सुवर्ण पटकावला. वरून जोगमनावर आणि प्रसाद सायनेकर यांनीही पदकं मिळवून संघाचा दबदबा कायम ठेवला.

१४ वर्षाखालील मुलींच्या गटात निधी मुचंडी (सेंट मेरीज) हिने ५० व १०० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये सुवर्ण जिंकत बेळगावचा झेंडा उंचावला. तन्वी कारेकर (हेरवाडकर स्कूल), श्रेया जोगमनावर, कनक हलगेकर आणि तन्वी मुचंडी यांनीही डायव्हिंग आणि रिलेमध्ये चमकदार यश मिळवले.

१४ वर्षाखालील मुलांमध्ये वरद खानोलकर (जी.जी. चिटणीस) याने चार सुवर्ण पटकावले, तर अमोघ रामकृष्ण (सेंट पॉल्स), अर्णव चिवटे (कामधेनू स्कूल) आणि मोहित काकतकर (सेंट झेवियर्स) यांनीही एकापेक्षा अधिक पदकं जिंकली.

🏅 प्रशिक्षण आणि मार्गदर्शन

वरील सर्व जलतरणपटू हे आबा व हिंद क्लबचे सदस्य असून ते गोवावेस, हिंद सोशल आणि अशोकनगर येथील ५० मीटर जलतरण तलावात नियमित सराव करतात. त्यांना एनआयएस प्रशिक्षक विश्वास पवार, अमित जाधव, शिवराज मोहिते, रणजीत पाटील, संदीप मोहिते, सतीश धनुचे, किशोर पाटील, भरत पाटील, मारुती घाडी आणि कल्लप्पा पाटील यांचे मार्गदर्शन लाभते.

या जलतरणपटूंना दक्षिणचे आमदार अभय पाटील, उत्तरचे आमदार राजू शेठ, आबा हिंद क्लबचे अध्यक्ष शितल हुलभते, अरविंद संगोळी, राजू गडकरी, शुभांगी मंगळूरकर आणि सुनील हनमण्णावर यांचेही मोलाचे प्रोत्साहन मिळत आहे.

बेळगावच्या या युवा जलतरणपटूंनी राज्यभरात शहराचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

nineteen + eleven =

error: Content is protected !!